Thursday, June 13, 2013

2 scenes.


ही गोष्ट आहे एका निसर्गरम्य पर्यटन केंद्राजवळची...
पहाटेची  साधारण सहाची वेळ. सूर्य नुकताच उगवत होता. पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. आम्ही ५ - ६ मित्र नदी किनारी अंघोळ करण्यासाठी गेलो होतो. छोटीशी छानशी नदी होती ती. जेम-तेम गुढग्या इतकं पाणी होत. एक छोटासा पूल पण बांधला होता नदीवर.
 बरीच लोकं फिरायला अली होती नदीकाठी. तरुण मित्र होते, जोडपी होती, म्हातारे कोतरे होते. नेहमी प्रमाणे जोडप्यांचे चाळे चालू होतेच.  त्यातलं एक जोडप पुलावरून नदीच्या दुसऱ्या तीरावर गेलं. थोड इकडे तिकडे पहिल अणि मुलीने मुलाला घट्ट मिठीच मारली.
आम्ही विचार करत होतो, मिठीच मारायाची होती तर पलिकडे जायची काय गरज होती? ह्यांना घरी वेळ कमी पडतो की एकोपा मिळत नाही कळतच नाही.

 दूसरी गोष्ट आहे माझी ... म्हणजे खर पहिल तर माझ्या बायकोच्या प्रेमाची ... कुत्र्यांवरच्या !!
मी अणि माझ कुटुंब गेल्या आठवड्यात कार्ला MTDC ला फिरायला गेलो होतो. भुर-भुर पाउस पडत होता. छान वातावरण होत तिकडे! बऱ्याच दिवसांनी सकाळी फेरफटका मारायचा योग आला होता. मुलं लवकर  उठणार नाहीत याचा अंदाज घेउन आम्ही फिरायला निघलो. boating करावं असा प्लान होता. पण पाणी  कमी असल्यामुळे ते नशिबात नव्हत. so  be  it म्हणून फिरत फिरत नदी पार केली.

एक छोटस कुत्र्याच पिल्लू दिसल  मला. मी नेहमी प्रमाणे त्या पिल्लाला बोलावल जवळ. माझ्या बायकोला कुत्रे इतके आवडतात याची कल्पनाच नव्हती मला. तिने लगेच हाड-हाड करायला सुरवात केली. ते पिल्लू बिचारं confuse  झालं. ते जस जस जवळ येत होत तस तस बायको माझ्या मागे लपायला लागली. पिल्लू तिच्या मागे मागे. मग तिने मला घट्ट मिठीच मरली. १-२ चकरा मारून ते पिल्लू बिचारं निघून गेल.

आता अस बघा… हे दोन्ही scenes जर एकाच वेळी घडले असतील तर…



2 comments:

  1. Pahilya scene madhe kutra navta?? Pakka na?

    ReplyDelete
  2. kutryacha pillu hota ... so naditun te dislach nahi !!

    ReplyDelete